मराठी व्याकरण – प्रयोग





खाली दिलेली टेस्ट सोडवा…

प्रयोग – वाक्यातील कर्ता, कर्म,
व क्रियापद यांच्या
परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.

मराठीत प्रयोगाचे तीन
प्रकार पडतात
.

1.कर्तरी प्रयोग – 

2.कर्मणी प्रयोग 

3.भावे प्रयोग 

1. कर्तरी प्रयोग (Active
Voice) :

जेव्हा क्रियापदाचे रूप हे
कर्त्याच्या लिंग
किंवा वचनानुसार बदलत असेल तर
त्या प्रयोगास
 कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.

उदा .

  • तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी)
  • ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)
  • ते चित्र काढतात. (कर्ता- वचन)
  • 2. कर्मणी प्रयोग (Passive
    Voice) :

    क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा
    वचनानुसार बदलते तर त्यास
     कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.

    उदा .

    • राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)
    • राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग)
    • राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन)

    3. भावे प्रयोग : जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वचनात बदल
    करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास
     भावे प्रयोग असे म्हणतात.

    उदा .

    • सुरेशने बैलाला पकडले.
    • सिमाने मुलांना मारले.
(टीप -प्रयोग ओळखण्याची सोपी युक्ती.- 
 1. कर्तरी प्रयोग – कर्त्याला कर्माला प्रत्यय नसतो.
                           क्रियापद वर्तमानकाळात , उदा राम बैल बांधतो. 
 2. कर्मणी प्रयोग – कर्माला प्रत्यय नसतो.
                            क्रियापद भूतकाळात उदा – रामाने बैल बांधला. 
 3. भावे प्रयोग – कर्त्याला व कर्माला प्रत्यय असतो.)
                    क्रियापद एकारांत असते म्हणजे शेवटच्या अक्षरात ए मिसळलेला असतो. 
                    उदा. रामाने बैलास बांधले.




    Share with your best friend :)

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *